भिरवंडे रामेश्वर मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिनी अभिषेक.

कणकवली/मयुर ठाकूर

कणकवली, दि. १५ शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे आज भिरवंडे रामेश्वर मंदिर दुधाभिषेक करण्यात आला. रामेश्वराच्या पिंडीवर अकरा लिटर दुधाचा अभिषेक करून खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भिरवंडे गावच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊत हे बहुमताने पुन्हा एकदा विजयी होतील अशी अपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून देव रामेश्वरला साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, भिरवंडे सरपंच नितीन सावंत, गांधीनगर उपसरपंच राजेंद्र सावंत, महादेव सावंत, संजय सावंत, संतोष सावंत, प्रकाश घाडीगावकर पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेश सावंत, अनिल सावंत, शेखर सावंत, संतोष दळवी , अनिल सावंत, सतीश सावंत, अमित सावंत आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून भिरवंडे गावासाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. गांधीनगर येथील धरण प्रकल्पासाठी ही खासदार राऊत यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच जांभूळभाटले येथे मोबाईल टॉवर, भिरवंडे गावातील विविध रस्तयांसाठी निधी तसेच कनेडी हायस्कूल इमारत बांधकामासाठी ही निधी उपलब्ध करून दिला. यावेळी खासदार विनायक राऊत यांचे आभार व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मागणी रामेश्वराकडे करण्यात आली

error: Content is protected !!