अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

आरोपीच्यावतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

  कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रणय उर्फ गणेश प्रकाश सावंत (नाधवडे , तालुका वैभववाडी ) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक- १ श्री. एस. एस. इंदलकर यांनी पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्याच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.
  २५/०८/२०२६ रोजी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला व तिचे आईला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२), ७५(३), ७६, ७९ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला २६/०८/२०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. 
 न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करताना आरोपीने तपासकामात सहकार्य करावे, फिर्यादीवर तसेच सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये तसेच फिर्यादीचे राहत्या ठिकाणी जाऊ नये, सरकार पक्षाचे पुराव्यात ढवळाढवळ करू नये, परत अशाप्रकारचा गुन्हा करू नये अशा अटीसह जामीन मंजूर केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!