‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून कुडाळ शहरात विशेष स्वच्छता मोहीम

गणेश घाट ते पंचायत समिती परिसरासह कविलकट्टे येथील पाणवठ्याची स्वच्छता

नागरिकांचा सहभाग

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम कुडाळ नगरपंचायतीमार्फत २८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आला. या मोहिमेत मुख्य गणेश घाट ते पंचायत समिती कुडाळपर्यंतच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. तसेच कविलकट्टे येथील मुख्य ओढ्यावरील पाणवठ्याच्या परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या अभियानादरम्यान परिसरातील प्लास्टिक, कचरा तसेच इतर घाण गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ व सुंदर कुडाळ शहरासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका सौ. नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले.

error: Content is protected !!