शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे चा कु.सुश्रुत नानल पहिला तर कु.यश पवार पाचवा.

कणकवली/मयूर ठाकूर
ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा मधील बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या स्कूलचा विद्यार्थी कु.सुश्रुत मंदार नानल याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर याच शाळेचा विद्यार्थीकु. यश देऊ पवार याने पाचवा क्रमांक पटकावत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी. पी तानावडे सर ,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.






