सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या “स्मार्ट व्हेईकल टायर” प्रोजेक्टची दिल्ली मध्ये होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ साठी निवड.

कणकवली/मयुर ठाकूर.

       महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी महाराष्ट्र शासन यांच्या   माध्यमातून दिल्ली मध्ये होणाऱ्या *स्टार्टअप  महाकुंभ* या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असलेला कु. कार्तिक मोरे,  या विद्यार्थ्यांने मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक श्री. एकनाथ मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या "स्मार्ट व्हेईकल टायर" या प्रोजेक्टची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे.
    सदरचा सोहळा हा दिनांक 18 मार्च 2024 ते 20 मार्च 2024 या कालावधीत देशाचे पंतप्रधान माननिय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
    "स्मार्ट व्हेईकल टायर" या प्रोजेक्टमध्ये बनविण्यात आलेल्या स्मार्ट टायर या संकल्पनेतुन पंक्चर झालेल्या टायरमुळे होणा-या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक श्री. एकनाथ मांजरेकर व त्यांच्या मार्गदर्शनखाली काम केलेल्या व स्टार्टअप महाकुंभ साठी निवड झालेल्या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी यांचे संस्थेच्या अध्यक्षा सन्मा. सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष सन्मा. निलेशजी राणे, सचिव सन्मा. नितेशजी राणे, प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन वंजारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!