गणेश सजावट स्पर्धेतून शिवसेनेची संघटना घराघरांत

कुडाळ शहरातील उपक्रमांचे आमदार निलेश राणेंकडून कौतुक

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे शहरातील संघटना अधिक मजबूत होत आहे. गणेश सजावट स्पर्धेच्या माध्यमातून संघटना घराघरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात आयोजित गणेश सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कुडाळ शहर मर्यादित शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रभागनिहाय घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील ५१ विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या ५१ विजेत्यांमधून उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम क्रमांक साई तळवणेकर, द्वितीय क्रमांक सत्यवान राऊळ आणि तृतीय क्रमांक दीपक पाटील यांनी पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिके राजाराम गडेकर आणि प्रदीप राऊळ यांना देण्यात आली.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. असे उपक्रम पक्ष संघटना वाढीसाठी पूरक असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहरप्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदनी कांबळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

error: Content is protected !!