कुडाळात ६ ऑक्टोबरपासून ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा हॅपिनेस प्रोग्राम

कुडाळ येथे The Art of Livingच्या वतीने ‘हॅपिनेस प्रोग्राम विथ उमेशजी’चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ६ ते ८.३० या वेळेत ओंकार डीलक्स हॉल, महामार्गाजवळ, कुडाळ येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सुदर्शन क्रिया, योगासने, प्राणायाम, ध्यान (मेडिटेशन) तसेच व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल विज्डम) याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उमेशजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून, तणावमुक्ती, सकारात्मकता, उत्साह, मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्याची काळजी यांसह विविध बाबींवर सहभागींसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमासाठी इच्छुकांनी ऑनलाईन https://aolt.in/1062848 या लिंकवर नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी उमेश – 9657479866, कृपेश – 8007969105, निलेश – 9422632156 आणि राखी – 9404944628 यांच्याशी संपर्क साधता येईल.

error: Content is protected !!