अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणेंचा समावेश

महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती

मंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ च्या आढाव्यासाठी राज्यात केला दौरा

राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविणे तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्देशानुसार घेण्यात आला आहे.
या उपसमितीमार्फत राज्यातील अपुरा पाऊस, त्यातून निर्माण होणारी दुष्काळजन्य परिस्थिती, त्यावरील उपाययोजना तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!