आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय तायक्वांदोस्पर्धेत यश आणि विभागासाठी निवड

कणकवली/मयूर ठाकूर

क्रीडा संकुल ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे या स्पर्धेत आराध्य गोडवे, गौरेश तायशेटे, दूर्वा सरूडकर, दीपश्री तेंडुलकर सर्व विद्यार्थी इयत्ता नववी अ तर मितेश मिठारी इयत्ता दहावी अ व शाश्वत गाठे( सहावी B) या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे या पाचही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी. पी तानावडे,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

error: Content is protected !!