कणकवलीत जागतिक ग्राहक दिन साजरा

पेन्शनर भवन कणकवली येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दादा कुडतरकर हे उपस्थित होते. जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहक संरक्षण कायदा 1986, त्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार, ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने होणारी फसवणूक, त्यावर तक्रार कशी व कोठे करावी, ऑनलाईन फसवणूक होऊ नये याबद्दल काय दक्षता घ्यावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा संघटक दादा कुडतरकर, तालुका अध्यक्ष सौ श्रद्धा कदम तालुका सचिव सौ पूजा सावंत यांनी केले. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त वेतनधारकांनी चांगल्या प्रकारे प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच ग्राहक पंचायत ही चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. सदर कार्यक्रमाला सेवानिवृत्त वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष तथा ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक श्री. दादा कुडतरकर, सेवानिवृत्त वेतनधारक संघटनेचे सचिव श्री व्ही.के.चव्हाण व सेवानिवृत्त वेतनधारक उपस्थित होते तसेच ग्राहकपंचायतच्या कणकवलीच्या अध्यक्ष सौ.श्रद्धा कदम सचिव सौ. पूजा सावंत सदस्य माणगावकर या उपस्थित होत्या.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!