पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन
विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन
महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्वेता कोरगावकर जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा भारतीय जनता पक्ष, प्रज्ञा ढवण उपाध्यक्षा भाजप प्रदेश महिला मोर्चा, संजना सावंत माजी जि.प. अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत प्राची कर्पे महिला शहर अध्यक्षा भाजपा, संजीवनी पवार, कविता राणे नगरसेविका, संजना सदडेकर, सायली मालंडकर, रेशमा फोंडेकर, आस्मा बागवान, निलम चव्हाण, उज्ज्वला ताम्हाणेकर, साक्षी वाळके, भारती पाटिल, पुजा माणगावकर, स्मिता कामत, मीरा कवडे, रोटरी क्लब कणकवलीच्या सदस्या संध्या पोरे, मोहिनी राठोड, वैजयंती मुसळे, रंजना कुडतरकर, तृप्ती कांबळे, माधवी मुरकर, डाॅ. प्राजक्ता तेली, उमा परब उपस्थिती होत्या.
पाककला स्पर्धेमध्ये 70 महिला स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक मंजिरी वारे द्वितीय क्रमांक मीना सुतार तृतीय क्रमांक दिपा कलिंगण आणि उत्तेजनार्थ आयेशा कांबळे, श्वेता शिरसाट, स्वप्नाली शिरोडकर, दिपाली पवार, विशाखा पेडणेकर, शृतिका चव्हाण, गार्गी कामत तसेच सर्व सहभागी स्पर्धेकांना सहभाग सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देण्यात आल्या.या स्पर्धेसाठी हर्ष कॅफेचे मालक शेफ अमित टकले आणि रिलॅक्स हाॅटेलचे मालक दिशांक काळसेकर यांनी परिक्षण केले.संगित खुर्चीमध्ये प्रथम क्रमांक मंजिरी वारे द्वितीय क्रमांक शिवन्या धुमाळे, रस्सीखेच मध्ये प्रथम दिपा पेडणेकर गट, द्वितीय आस्मा बागवान गट, catch the stick मध्ये प्रथम क्रमांक संज्ञा सांडव द्वितीय क्रमांक रसिका शिरवलकर, उलट सुलट शब्दकोश प्रथम क्रमांक प्रियांका जाधव द्वितीय क्रमांक दिया खानविलकर, पुठ्ठा पास करत रेषा ओलांडणे, उखाणे, प्रश्नमंजुषा असे विविध खेळ घेण्यात आले. रोटरी क्लब कणकवलीच्या वतीने आरोग्य शिबीर घेताना डाॅ. प्रिती पावसकर आणि डाॅ. विद्याधर तायशेटे यांच्या संजीवन हाॅस्पिटल चे सहकार्याने 100 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी तसेच महिलांची जनरल तपासणी करण्यात आली. सुषमा पोटफोडे यांनी कोळीनृत्य सादर केले.याज्ञवी कोदे, स्वानंदी कोदे, तन्वी शिरसाट वेदा कामत यांनी नृत्याविष्कार केले. पुनम आणि स्मिता आवटी यांनी रेडिमेड रांगोळी आणि ब्लाउज यांचे स्टाॅल लावले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया नलावडे नगरसेविका, लीना काळसेकर, प्रियाली कोदे,किशोरी राणे, विनिता राणे, आरती राणे, विणा राणे , स्वप्नाली जाधव, प्रणाली चव्हाण, डाॅ.सिद्धी नेरकर, क्रांती लाड, आणि बिट्टू काळसेकर यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संपदा पारकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले.
कार्यक्रमासाठी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होऊन खेळाचा आनंद लुटत होत्या.