मंगेश गुरव यांचा खारेपाटण शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार संपन्न…

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्षात झपाट्याने दैनंदिन घडामोडी होताना दिसत असून शिवसेना पक्ष कणकवली, देवगड,वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी खारेपाटण येथील सुपुत्र व शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांची नुकतीच निवड झाली असून आज खारेपाटण येथील शिवसेना संपर्क कार्यालयात मंगेश गुरव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर,जिल्हा महिला संघटक सौ नंदिनी पराडकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे,सौ अस्ताली पवार,खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री सुहास राऊत,आदी प्रमुख पदाधिकारी तसेच खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्ते श्री मंगेश गुरव म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला.त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब व आमचे मार्गदर्शक नेते किरण उर्फ भैया सामंत त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे व संदेश पटेल तसेच युवा अध्यक्ष सुकांत वरुणकर,यांचे आभार मानतो.व येऊ घातलेल्या लोकसभेच्या तोंडावर पक्षाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी संघटनेच्या व पक्ष्याचा धेय धोरणांच्या अधीन राहून पक्षाची भूमिका परखडपणे मंडण्या बरोबरच पक्ष संघटना वाढीसाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!