चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध विकास कामांचे भूमी पूजन…!

सुरेश साटम, आबा लब्दे, सुनिल पवार यांच्या हस्ते झाली भूमी पूजन

आचरा मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने आज चिंदर मधील विविध विकास कामांनचा भूमिपूजन सोहळा सरपंच नम्रता महंकाळ- पालकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साटमवाडी पाण्याचा पाट बांधणे 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर कामाचे भूमी पूजन सोसायटी संचालक सुरेश साटम, लब्देवाडी शाळा दुरुस्ती जिल्हा परिषद स्तर कामाचे भूमी पूजन आबा लब्दे यांच्या हस्ते, भटवाडी सार्वजनिक विहीर दुरुस्ती भारत निर्माण ग्रामपंचायत स्तर पंधरावा वित्त आयोग, भटवाडी पोसेपाणी पाठ बांधणे ग्रामपंचायत स्तर 15 वा वित्त आयोग, थोरला आंबा रस्ता डांबरीकरण करणे 25/15, भटवाडी शाळा दुरुस्त करणे या कामांनचे भूमी पूजन सोसायटी व्हाईस चेअरमन सुनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, व्हाईस चेअरमन सुनिल पवार, रवींद्र घागरे, विनोद

लब्दे, रविकिरण गावडे, संतोष अपराज, दिगंबर जाधव, संतोष पवार, गौरव साटम, भानजी साटम, अजित लब्दे, संदिप साटम, भास्कर साटम, सत्यवान गावडे, भरत वराडकर, साटम, काळे, लाड, जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!