सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन

बांगलादेशी नागरिकांचा व त्या संबंधितांचा कसून शोध घ्या
पोलीस अधीक्षकांकडे आमदार नितेश राणे यांची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व आरोंदा या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून १० नागरिकांना अटक केली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग पोलिस दलाचे अभिनंद करत असल्याचे पत्र आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे.
हा प्रकार गंभीर असून या बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी करून त्यांनी भारतात प्रवेश कसा केला? या कामी त्यांना कोणी मदत केली? साथीदार कोण? सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का? त्याचप्रमाणे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करण्यामागे त्यांचा हेतु काय होता? या दृष्टीने तपास करून जनतेच्या मनातील निर्माण झालेली भिती दूर करावी, अशी मागणी श्री राणे यांनी केली आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली