सिंधुकन्या शमिका चिपकर हिची चमकदार कामगिरी

गोवा येते आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत मिळविले यश

सावंतवाडी शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती पणजी, पणजी महानगरपालिका आणि पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोवाडा गायन स्पर्धेमध्ये’ कु. शमिकाने पोवाडा सादर करून तिच्या मुष्टीफंड हायस्कूल, गोव्याच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला.
ती सध्या ‘खेलो इंडिया गोवा’ येथे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे व मुष्टीफंड हायस्कूल, गोवा येथे शिक्षण घेत आहे. तिने राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये २ सिल्व्हर व १ब्राॅन्झ मेडल पटकावले. त्यातून तिची दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्या स्पर्धेमध्येही तिने चांगली कामगिरी केली होती.
त्याचप्रमाणे तिची राज्यस्तरीय ‘साने गुरुजी कथामाला’ स्पर्धेसाठी मुष्टीफंड हायस्कूल गोवा येथून निवड होऊन तिने त्या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकफ पटकावला होता.
या तिच्या यशामध्ये मुष्टीफंड हायस्कूलच्या शिक्षकांचे तसेच तिच्या जलतरण प्रशिक्षकांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!