बांधकाम कामगारांना नोंदणी साठी आचरा ग्रामपंचायत कडून आवाहन

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा कार्यक्षेत्रात बांधकाम करणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत करण्याचे आवाहन आजचा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे
याबाबत बांधकाम कामगारांच्या कामावर मालकाकडे ठेकेदाराकडे तो बांधकाम कामगार म्हणून जाणार असेल याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडे देणे गरजेचे आहे. या नोंदणी मध्ये बांधकाम कामगाराचे नाव कोणाकडे काम करणार त्याचे नाव व पत्ता तसेच फोन नंबर कधीपासून कधीपर्यंत काम करणार, केले याबाबत च्या तपशीलासह ग्रामपंचायत आचरा येथे अर्ज दाखल करायचा आहे.या सोबत कामगाराच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा फोटो असलेले ओळखपत्राचा पुरावा मतदान किंवा पॅन कार्ड बँकेचे पासबुक आधार कार्ड यापैकी एक जोडून अर्ज दाखल करण्याचे आवाहन आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांनी केले आहे

error: Content is protected !!