महामार्गावर अवघड वळणावर कंटेनर पलटी

शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला अपघात
महामार्गावर वागदे येथे नाईक पेट्रोल पंपाजवळ वळणावर गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होत अपघात झाला. आज शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातात या कंटेनर मध्ये असलेले तीन पैकी दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान यापूर्वी हळवलं फाट्यावर अवघड वळणावर सातत्याने अपघात होत असताना आता नाईक पेट्रोल पंपा नजीकच्या वळणावर हा अपघात झाल्याने वागदेतील हा भाग अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली