हुमरमळा-वालावल ते पडोसवाडी चेंदवण माऊली मंदिर रस्ता कामाची चौकशी करा

सरपंच अमृत देसाई यांची खास. विनायक राऊत यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल ते पडोसवाडी चेंदवण माऊली मंदिर रस्ता हा प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतुन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मंजुर करुन ग्रामस्थांची मागणी दुर केली खरी मात्र ठेकेदारांच्या भ्रष्ट निती मुळे काम निकृष्ट होऊन रस्ता पुर्ण खराब झाला असुन ठेकेदारावर कार्यवाही व्हावी अशी मागणी सरपंच अमृत देसाई यांनी खासदार विनायक राऊत यांच्या कडे केली आहे
श्री देसाई यांनी खा राऊत यांची भेट घेऊन हुमरमळा वालावल ते पडोसवाडी चेंदवण माऊली मंदिर रस्ता कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करत ठेकेदाराच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. अगदी तीन वर्षांत रस्ता खराब होण्याचा विक्रम ठेकेदारांने केला आहे असे सांगून श्री देसाई म्हणाले नुसती थुकपट्टी लावुन रस्ता काम निकृष्ट केले आहे. त्यामुळे ठेकेदाला पाठीशी न घालता कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी श्री देसाई यांनी केली आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!