संजय भोगटे, यशवर्धन राणे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठाला जोरदार धक्का

दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश

प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे, उबाठा युवासेना जिल्हा प्रवक्ते श्री. यशवर्धन राणे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर,शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.संदेश सावंत पटेल,कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.बबन शिंदे,मालवण तालुकाप्रमुख श्री.राजेंद्र गावकर यांच्या मार्गदर्शाखाली शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला.
उबाठाचे युवासेना जिल्हा प्रवक्ते श्री.यशवर्धन राणे यांनी मागील १५ दिवसापूर्वी शिवसेना नेते,सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत याची भेट घेतली होती.त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचेशिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.संदेश सावंत पटेल,कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.बबन शिंदे,मालवण तालुकाप्रमुख श्री.राजेंद्र गावकर यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!