इंटरमिजिएट ग्रेड ए श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा पाट हायस्कूलमध्ये सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून पाट हायस्कूल मधून 55 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील सहा विद्यार्थ्यांना एक ग्रेड तर 23 विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाली आहे.
पूर्वा प्रदीप गोलतकर, सोहनी संदीप साळसकर, योगिता रामचंद्र मांजरेकर, प्रज्योत विजय मिस्त्री, मयूर महेश परब, राज लक्ष्मण पाटकर या विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन एस. के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संस्थाचालक आणि पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक शामराव कोरे क्रीडा शिक्षक कुबल सर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांचेही अभिनंदन करण्यात आले. वाढीव गुणाच्या प्रस्तावाकरिता या ग्रेडचा उपयोग होत असल्यामुळे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे .भविष्यात आर्ट कॉलेजला ऍडमिशन घेण्याकरिता इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी ऍडमिशन करिता इंटरमिजिएट श्रेणी महत्त्वाचे ठरते आज पाट हायस्कूल मधील बरेच विद्यार्थी कलाक्षेत्राकडे वळले असून त्यांनाही या परीक्षेचा लाभ झाला त्यामुळे वर्षभर या मुलांना कलाविषयक कामात गुंतवून ठेवले जाते त्यामुळे परीक्षेसाठी आवश्यक ती कौशल्य हे मुलं प्राप्त करतात या सर्व विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.