सिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण येथे १० वी १२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक आणि भावी खासदार श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यश कम्प्युटर अकॅडमी व खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथील इयत्ता १०वी /१२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
दी.८ जानेवारी २०२४ ते दी. १० जानेवारी २०२४ सलग तीन दिवस चालणाऱ्या १०वी/१२वी या मार्गदर्शन शिबिरात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमाला शिवसेना युवा जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर,युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत,शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई,खारेपाटण तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री सुहास राऊत,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या शिबिराकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओरोस येथील जिल्हा समपुपदेशक श्री विवेक कळसुळकर सर यांनी उपस्थित असलेलल्या विद्यार्थ्यांना १०वी /१२वी नंतर करियरच्या उपलब्ध असणाऱ्या संधी विषयी सखोल व अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांनी देखील विद्यार्याना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खारेपाटण हायस्कूल चे शिक्षक
श्री मोटे सर ,श्री शेट्ये सरयांनी केले तर आभार श्री गुरसाळे सर यांनी मानले.यावेळी १० वी १२ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण