डेगवे येथे भारत स्वाभिमान स्थापनादिन साजरा

भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत आज दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी श्री देव थापेश्वर मंदिर डेगवे येथे भारत स्वाभिमान स्थापनादिन साजरा करण्यात आला. पतंजली दिव्य योग मंदिर स्थापना दिन आणि पतंजली भारत स्वाभिमान स्थापनादिन 5 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी श्री. शेखर बांदेकर , प्रमुख पाहुणे भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी श्री. महेश भाट, भारत स्वाभिमान सह जिल्हा प्रभारी श्री. प्रकाश रेडकर, पतंजली योगसमिती सह तहसील प्रभारी श्री मधुकर देसाई , युवा भारत सावंतवाडी तहसील प्रभारी श्री मयुरेश गवंडळकर , सोशल मीडिया सावंतवाडी सह तहसील प्रभारी श्री लाडोबा देसाई, किसान सेवा समिती सावंतवाडी सह तहसिल प्रभारी श्री. संतोष मोरे, श्री. सुदन केसरकर, श्री. आपा चिंदरकर, श्री. अभिलाष देसाई, श्री. शेखर गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व योगसाधकांनी राष्ट्रनिष्ठ होण्याच्या दृष्टीने संकल्प घेतला, योगवर्ग घेण्यात आला , 54 सूर्यनमस्कार पूर्ण केलेत. तसेच होमहवन यज्ञ चे देखील आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजली योगसमिती डेगवे च्या योगसाधकांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!