रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू

रुपेशच्या खडतर मेहनतीला यश

निलेश जोशी । कुडाळ : रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली या सायकलपटूची निवड झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून या एकमेव सायकलपटूची निवड झाल्याने सायकलपटू रूपेश तेलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबद्दल माहिती देताना रुपेश तेली यांनी सांगितले, Race Across America (RAAM ) हि जगातील सर्वात लांब तसेच सर्वात कठीण सायकल शर्यत आहे. यामध्ये ४ हजार ८३० किमी अंतर तब्बल १२ तासात पूर्ण करणे आवश्यक असते . १७ हजार फूट उंची गाठायची असते. हि शर्यत अमेरिकेच्या १२ राज्यामधून जाते. त्यासाठी भारतातून अजूनपर्यंत ९ ते १० जणांनी भाग घेतला आणि त्यापैकी ४ जणांनी हि शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत भाग घेण्यासाठी पात्रतेची गरज असते. त्यासाठी भारतात इन्स्पायर इंडिया टीम तर्फे राईड घेतल्या जातात. त्यामध्ये डेक्कन क्लिफहँगर पुणे ते गोवा ६४३ किमी, द ग्रेट हिमालयीन अल्ट्रा लेह- द्रास -लेह ६०० किमी राईड तर अल्ट्रा स्पाईस रेस १७५० किमी गोवा-ऊटी-गोवा अशा राईड होतात. या राईड मात्र अतिशय खडतर असतात. त्यासाठी खूप सराव तसेच अभ्यासाची गरज असते. अशा राईड करणारे मोजकेच स्पर्धक असतात. रूपेशने सुपर रेडोनियर केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी झाली होती . त्यामुळे हे आव्हान त्याने स्वीकारले. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतूनही अजूनही कोणीही अशा शर्यतीसाठी साठी प्रयत्न केला नाही असे रुपेश तेली यांनी सांगितले.
डीसी साठी सराव म्हणून कुडाळ ते कन्याकुमारी अशी राईड करायचे ठरवले. पेडल फॉर हेअल्थ अशा हि संकल्पना घेऊन अमित तेंडुलकर, शिवप्रसाद राणे या सहकाऱ्यांसह त्याने १३०२ किमी अंतर कपात कुडाळ ते कन्याकुमारी प्रवास केला. २०० ते २५० किमी दिवसाला प्रवास करत १३०२ किमी चा प्रवास पूर्ण केला. हा प्रवास पूर्ण केल्यानंर मात्र आत्मविश्वास वाढला. कारण एवढा प्रवास करूनही कोणताही थकवा तणाव वाटत नव्हता. त्यामुळे आपण अजून बरेच काही करू शकतो याची खात्री पटली.
रुपेश म्हणाला, सायकल हि आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे . सोबती आहे . याचा संकेत बहुधा आपल्याला आपल्या लहानपणापासूनच मिळत आला आहे . जवळ जवळ ९० टक्के मुलांना लहानपणीच सायकल दिली जाते . पण आपण मात्र तिची सोबत हि शालेय जीवनापयंतच ठेवतो .
आजकाल मुलांमध्ये मोबाईल आणि मोटारसायकल याची आवड हि वाढत चालली आहे . आजकाल पालकच मुलांना महाग मोबाईल आणि मोटारसायकल घेऊन देतात . आजकालच्या आयुष्यात सायकल ची गरज हि सर्व वयोगटातील माणसांना आहे , ज्यमुळे शरीर निरोगी आणि स्वस्थ बनते हेच मुली आपण विसरत चाललो आहोत .
कोरोनाने मात्र आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला . शारीरिक स्वास्थ्य कमजोर आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीना ज्यावेळी corona चा त्रास उद्भवला त्या वेळी बऱ्याच जणांना याची प्रकर्षाने जाणीव झाली . सायकलिंग रनिंग swimming , बॅडमेंटन अशा बऱ्याच व्यायामप्रकारच्या मदतीने शारीरिक स्वास्थ्य तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ लागले . तसे पाठात सायकलिंग हा पर्याय बराच सोपा आणि आल्हाददायक आहे . सायकलिंग मुले निसर्गाशी जोडलेले राहतो. सायकलिंग पर्यावरणाला पूरक आहे .सकाळी उठून सायकलिंग केल्याने पहाटे वातावरणात असलेनीन शुद्ध हवा आपल्याला घेता येत्ते .मन प्रसन्न होते . नेगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते . हृदयविकाराचा धोका कमी होतो . असे अगणित फायदे आहेत असे रुपेश यांनी सांगितले..
रुपेश म्हणाला कि, वयाच्या ३५ व्या वर्षी व्यायामासाठी म्हणून सायकलिंगची सुरुवात केली . एमटीबी कयसालेपासून सुरुवात केली. जिमला जाण्यासाठीसायकलचा वापर करण्याचा उद्देश होता. तिथे कुडाळ सायकल क्लबचे सगळे सदस्य होते. ज्यामध्ये नेहमी कयसाले वरून आंबोली घाटात कसे गेलो ग्रुप राईड कशा करायच्या याबद्दल नेहमी ऐकत आलो होतो. त्यावेळी गजानन कांदळगावकर , प्रेमेंद्र पोरे, प्रमोद भोगटे, अमोल शिंदे असे बरेच जण या क्लबचे सदस्य होते. एक दिवस त्यांच्याबरोबर सायकलिंग करायची संधी मिळाली . आणि ती माझ्या आयष्यातली पहिली जास्त पल्ल्याची राईड ठरली. ७२ किमी अंतर मी त्या दिवशी सर केले. आंबोली घाट ते पारगड किल्ला आणि तेथून परत आंबोली अशा राईड मध्ये मी सर्वात शेवट होतो . त्यानंतर मात्र जी निसर्गाशी कयसालेशी नाळ जोडली गेली ती आतापर्यंत अगदी घट्ट होत गेली.
पहाटे लवकर म्हणजे ३ किंवा ४ वाजता उठायचे आणि ४ किंवा ५ वाजताच घरातून बाहेर पडायचे. असा माझा दिनक्रम बनला. आठवड्यातून ४ तरी राईड करायच्या. पहाटेच्या वातावरणात जी प्रसन्नता असते ती मात्र अनुभव करायला सकाळी निश्चय करून अंथरून सोडणे खूप आवश्यक असते. या सगळ्यात निसर्गाशी एक जवळीक निर्माण झाली. धबधबे, नदी नाले, समुद्र किनारे या सफारी पण कयसालेने होत होत्या. प्रत्येक ठिकाणचे फोटो काढणे आणि ते ग्रुप तसेच फेसबुकला पोस्ट करणे यामुळे सायकलिंगमध्ये बरेच जण जोडले गेले. त्याबरोबर शारीरिक स्वास्थ्यामध्ये पण बराच फरक पडू लागला. शारीरिक क्षमता वाढू लागली. सायकलिंगचे अंतर हळू हळू वाढू लागले .
त्यादरम्यान गोव्यामध्ये १०० किमीची राईड होणार होती. त्यासाठी अविनाश पाटील, अथर्व सामंत आणि मी जायचे ठरले. हि आमच्यासाठी सर्वात मोठी राईड असल्याने उत्साह पण शिगेला पोहोचलेला होता. राईड पूर्ण झाल्यानंतर जे मेडल मिळाले त्यानंतर आमचा आनंद गगनात मावत नव्हता. काहीतरी खूप मोठे केल्याचे समाधान होते. मात्र हा उत्साह थोडच वेळ टिकला. कारण त्यानंतर समजले कि हि केवळ प्रॅक्टिस राईड होती. खरे आव्हान तर पुढे आहे. २००/३००/४००/६०० किमी अशा राईड एका वर्षात पूर्ण करायच्या असतात अशा सर्व राईड पूर्ण करणाऱ्याला SR (सुपर RANDONNEUR )अशी पदवी मिळते. या राईड ठराविक वेळेत तसेच कोणाचीही मदत न घेता पुऱ्या करायच्या असतात. सायकल मध्ये कोणताही बिघाड झाल्यास ती स्वतः दुरुस्त करणे आवश्यक असते. आमच्यासाठी हे सगळे नवीनच होते. अशी पदवी प्राप्त झालेले त्या वेळी ४५ जण गोव्यात होते. सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून अजून एकही SR झाला नव्हता हि खरोखर लाजिरवाणी गोष्ट होती. त्याच वेळी हे आवाहन मी स्वीकारले. मनामध्ये गाठ बांधली कि सिंधुदुर्गातून प्रथम एसआर व्हायचे. जेणेकरून बाकी सर्वाना प्रोत्साहन मिळेल.
त्यानंतर झालेली माझी २०० किमी राईसद मात्र अविस्मरणीय होती . १३.३० तासात हि राईड पूर्ण करणे आवश्यक होते कोणताही अनुभव नव्हता पण निर्धार होता कि मी करणार . हवा मारण्यासाठी छोटा पंप ,puncture पॅच खाण्यासाठी चॉकलेट energy बार आणि पाणी घेऊन मी निघालो राईड दरम्यान दोन वेळा सायकल puncture झाली . पहिला अनुभव असल्यामुळे बराच वेळ फुकट गेला . तरीही अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत सायकल खेचत हि राईड पूर्ण केली . अनोखा अनुभव गाठीशी होता.
या राईड नंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या शारीरिक ,मानसिक क्षमता वाढवण्यासाठी हि राईड माळ खूप उपयोगी पडली . पुढचे ३००/४००/६०० किमी चे आव्हान पण खूप मोठे होते .
३०० किमी साठी २० तास ४०० साठी २७ तास तर ६०० साठी ४० तासाचा वेळ हा निर्धारित असतो . ४०० आणि ६०० या राईड मात्र आव्हानात्मक असतात कारण या राईड दिवस आणि रात्र अशा स्वरूपात असतात . त्यासाठी खरा शरीराचा आणि मानसिक स्थितीचा कस लागात असतो
डेक्कन क्लीफहँगर २०२३ (१० वि मालिका) ही भारतातील अल्ट्रा सायकल रेस आहे. पुणे, महाबळेश्वर, सातारा, कराड, कोल्हापूर, निपाणी, हुबळी, बेळगाव, आंबोली घाट मार्गे सावंतवाडी, बांदा ….पणजी करून बॉगमालो बीच पर्यंत असा एकूण ६४३ किमी रस्ता आहे. त्यामध्ये सोलो सेल्फ suported Raam Qualifier, Solo crew supported Raam Qualifier तसेच Raam Style Relay अशा तीन प्रकारात स्पर्धकांना भाग घेता येतो. वय तसेच लिंगानुसर वेळ ठरलेला असतो उदाहरणार्थ महिलांसाठी 18 ते 49 वयासाठी 39 तास पुरुषांसाठी 18ते 49 वायासाठी 37 तास हा अवधी निर्धारित केलेला असतो त्याप्रमाणे सर्व रेस कॅटेगरी साठी वेगवेगळे वेळ हे निर्धारित असतात. ही रेस रविवार 25 नोव्हेंबर ला पहाटे 4 वाजता सुरू होऊन 26 नोव्हेंबर ला संध्याकाळी 6 वाजता संपली. ज्यामध्ये एकूण ७४ जणांनी भाग घेतलेला होता त्यामधील ३८ जण Raam साठी पात्र ठरले.
Raam अर्थातच Race across America ही एक जगातील अवधड रेस आहे. अशा राईड करण्यातही शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आहार नियंत्रित ठेवणे खूप अत्यावश्यक असते . त्यासाठी दररोजच्या आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक असते .. शरीरात कार्बोहैड्रेट्स ची आवश्यकता असते … तसेच सायकल चालवताना घामावाटे पाणी आणि मिठाची कमतरता होत असते त्यासाठी पाणी /इलेकट्रोल ors याचे योग्य संतुलात राखणे पण खूप गरजेचे असते , ride करायच्या आधी पण बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागतो . नियमित सरावाद्वारे शरीरावर योग्य ते नियंत्रण आपण मिळवू शकतो .
अशा राईड करण्यातही शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आहार नियंत्रित ठेवणे खूप अत्यावश्यक असते . त्यासाठी दररोजच्या आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक असते .. शरीरात कार्बोहैड्रेट्स ची आवश्यकता असते … तसेच सायकल चालवताना घामावाटे पाणी आणि मिठाची कमतरता होत असते त्यासाठी पाणी /इलेकट्रोल ors याचे योग्य संतुलात राखणे पण खूप गरजेचे असते , ride करायच्या आधी पण बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागतो . नियमित सरावाद्वारे शरीरावर योग्य ते नियंत्रण आपण मिळवू शकतो .
सायकल ची निवड पण खूप महत्वाची असते . अशा राईड साठी रोड प्रकारची सायकल खूप उपयोगी पडते . रोड सायकल हि सहसा race साठी वापरली जाते . या सायकलचे टायर बारीक असून हॅन्डल हा वरून खाली आलेला असतो (डाउन हॅन्डल बार ) त्यामुळे चालवणाऱ्याला ३ ते ४ प्रकारे सायकल पकडण्यास मदत होते … दमछाक कमी होते … समोरून येणारी हवा हि पण अडत नसल्यामुळे स्पीड पण वाढतो . सहसा वापरली जाणारी सायकल म्हणजे MTB (माउंटन सायकल ) या सायकल चे टायर हे थोडे जाड असतात या सायकल खडतर रस्त्यावर चालवण्यासाठी जास्त वापरतात . या सायकलची किंमतही कमी असल्यामुळे सर्वाना परवडते . तिसरा प्रकार म्हणजे हायब्रीड सायकल (CITY cycle ) हि सायकल व्यायामासाठी वापरली जाते .. नियमित व्यायाम करणारे याचा वापर जास्त करतात याचे टायर हे कमी जाडीचे असतात त्यामुळे हि सायकल रोड आणि ऑफ रोड दोन्ही ठिकाणी सहज चालवता येते . माझी पहिली सायकल mtb असल्यामुळे मी MERIDA कंपनीची सायक्लोक्रोस ३०० हि सायकल निवडली . त्यामुळे सायकलिंग मध्ये आणि स्पीड मध्ये पण खूप फरक पडला . १४ सप्टेंबर २०१९ साली कोकण randonneur आयोजित ३०० किमी राईड मध्ये भाग घेऊन १९ तासात राईड पूर्ण केली .
४०० किमी ची राईड मात्र खूप काही शिकवून गेली . २७ तास वेळ असल्यामुळे राईड दरम्यान झोप मिळत नाही . त्यामुळे हा अनुभव पण वेगळा असतो . या राईड दरम्यान सायकल मध्ये ४ वेळा puncture झाल्यामुळे हि राईड अपुरी राहिली . राईड साठी केलेला कुडाळ ते हुबळी प्रवास , झालेली दगदग आणि राईड साठी झालेला खर्च या सगळ्याचा विचार करता खूप नैराश्य आले . तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा सगळेजण वाह वाह करणारे असतात … पण ज्यावेळी मात्र अपयश येते ती स्थिती मात्र विकट होते .. त्यावेळी कोणीही साथ देणारा नसतो . खूप निराश झालो .. पण जिद्द मात्र सोडली नाही आता मागे वळणे नाही … अपयशाला खचून मागे वळणे हि मानसिकता कमजोर माणसांची निशाणी आहे . आणि मला कमजोर बनायचं नव्हतं .. स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवले “उठा जागे व्हा आणि तेव्हापर्यंत कर्म करा जोपर्यंत लक्षप्राप्ती होत नाही “
२०१९-२० या वर्षात हा लढा पुन्हा नव्याने सुरु केला . १० नोव्हेंबर २०१९ ला २०० किमी , ८ डिसेंबर २०१९ ला पुन्हा २०० किमी , ११ जानेवारी २०२० ला ४०० किमी , २८ फेब्रुवारी २०२० ला ६०० किमी तर १७ ऑक्टोबर २०२० ला पुन्हा २०० किमी , २४ ऑक्टोबर २०२० ला ३०० किमी
अशा राईड पूर्ण केल्या यावेळी माझा पहिला SR (super Randonneur )पूर्ण झाला . या दरम्यान ३० नोव्हेंबर २०१९ ला ४०० किमी राईड बेंगलोर येथे केली .. .त्यामध्ये पण अपयश आलेले . पण त्यावर मत करत पुढे जाणे पण खूप काही शिकवत होते . २४ ऑक्टोबर गोआ येथे माझा पहिला SR पूर्ण झाला .
या एकूण प्रवासात बरेच अनुभव गाठीशी होते . सायकल बद्दल खूप काही समजून घेता आले … सायकल ची निगा कशी राखावी , चालवायची पद्धत कशी असावी , सीट ची उंची किती असणे योग्य आहे . सायकल रिपेरिंग तसेच चैन मध्ये कोणते ऑइल घालावे … बरेच काही अनुभव गाठीशी होते .
सिन्धुदुर जिल्ह्यातून पहिला sr झाला . सायकलिंग क्षेत्रात किती काही आव्हाने आहेत याबद्दल जागरूकता बऱ्याच जणांना झाली . त्यामुळे एक उद्देश सफल झाला . सायकलिंग चे महत्व समजण्यासाठी हातभार लागला .सिंधुदुर्गातून नवीन सायकलिस्ट तयार होणे गरजेचे होते . शारीरिक स्वास्थ्य आणि प्रदूषणावर मात अशाही प्रकारे करता येते याबद्दल जागरूकता निर्माण झाली . २०२०/२०२१ साली दुसरा SR सिंधुदुर्गातील बऱ्याच नवीन सायकलिस्ट बरोबर केला . हरीश नार्वेकर , पुष्कर कशाळीकर ,dr अभिजित वझे, शिवप्रसाद राणे , शंकर तेजम, यांनी पण sr पूर्ण केला .
या सगळ्यासाठी सर्वात महत्वाची सायकल आणि अशा सायकल घेणे त्याची सर्विस यासाठी मात्र सिंधुदुर्गाबाहेर जावं लागायचं सायकल चे बरेच प्रकार आणि बऱ्याच कंपन्या असतात आणि यासाठी जिल्ह्याबाहेर जाणे सर्वांस परवडणारे नव्हते … त्यासाठी या सगळ्या प्रकारच्या सायकल एका ठिकाणी मिळाव्या या हेतूने सायकल INSPIRE CYCLES हे उघडण्याचा निर्णय घेतला .. आज सिंधुदुर्गात अनेक नावाजलेले cycle brands वाजवी किमतीमध्ये उपलब्ध आहेत . सर्व प्रकारच्या सायकलची दुरुस्ती पण शॉप मध्ये केली जाते .
सिंधुदुर्गात सायकलिंग मध्ये बऱ्याच जणांचा मोलाचा सहभाग आहे त्यामध्ये प्रामुख्याने डॉ बापू परब ,गजानन कांदळगावकर , हरीश नार्वेकर , डॉ मिलिंद खानोलकर , डॉ साईनाथ पित्रे , डॉ सोमनाथ परब डॉ प्रल्हाद मंचेकर ,मकरंद वायंगणकर ,डॉ राजेश उबाळे आणखी बरेच जण या चळवळीत सहभागी आहेत .सायकलिस्ट अससोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या नावाने सिंधुदुर्गात सायकलिंग साठी चालना मिळाली . inspire sindhudurg सारखे इव्हेंट सिंधुदुर्गात होतात ज्यामध्ये मुंबई ,गोवा कोल्हापूर रत्नागिरी तसेच भारताबाहेरील सुद्धा सायकलिस्ट नि आज हजेरी लावली आहे . १०० /५०/२५ किमी सायकलिंग असे या इव्हेंट चे स्वरूप आहे . इव्हेंट साठी ४५० ते ५०० सायकलिस्ट सहभाग घेतात .आंतरशालेय सायकलिंग स्पर्धा प्रकार हा शालेय स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे . पण आजपर्यंत त्याबद्दल कोणालाही माहित नव्हत ज्यामध्ये सिधुदुर्गातून अजून एकही सायकलिस्ट पुढे आला नव्हता . त्यामध्ये सायकल कोणती वापरतात त्याशिवाय कोणत्या प्रकारे हि स्पर्धा होते याद्द्दल पण कोणतीही माहिती नव्हती . गेली दोन वर्षे अससोसिएशन च्या पुढाकारामुळे या स्पर्धेची जागरूकता सर्वांमध्ये झाली आणि आज बरेच सायकलिस्ट आपले कौशल्य दाखवण्यासाठी पुढे येत आहेत,या असे रुपेश तेली यांनी सांगितले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!