महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,शाखा कणकवली यांच्या वतीने तहसीलदार कणकवली यांना निवेदन.

शिक्षकांना BLO (Booth level Officer) ची कामे न देण्याबाबत केली विनंती.
स्तनदा माता,दिव्यांग शिक्षक आणि गंभीर आजारी,एकशिक्षकी शाळा,मुख्याध्यापक आणि वेगळ्या क्षेत्रातील ऑर्डर असल्यास सवलत देण्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचेकडून देण्यात आले आश्वासन.
कणकवली/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली यांच्या वतीने शिक्षकांना बूथ लेवल ऑफिसर ची कामे न देण्याबाबत उचित कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन मा.तहसीलदार कणकवली यांना नुकतेच देण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-2023/प्र.क्र.506/टिएनटि-1अन्वये शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे स्पष्ट वर्गीकरण केले आहे.या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक पाच मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की,सदर शैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नये तसेच “परिशिष्ट ब” मध्ये अशैक्षणिक कामे राज्यातील शिक्षकांना न देणे बाबत इतर विभागांनी सूचना निर्गमित कराव्यात अशा प्रकारचा जिआर आहे.या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली यांच्या वतीने विविध मागण्या घेऊन मा. तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
चर्चेअंती स्तनदा माता, दिव्यांग शिक्षक आणि गंभीर आजारी,एक शिक्षकी शाळा,मुख्याध्यापक आणि वेगळ्या क्षेत्रातील ऑर्डर असल्यास सवलत देण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिले.
प्रसंगी
शिक्षक नेते टोनी म्हापसेकर,सुशांत मर्गज तालुकाध्यक्ष,निलेश ठाकूर सचिव,संतोष कांबळे कार्याध्यक्ष,सचिन सावंत कोषाध्यक्ष,संतोष कुडाळकर जिल्हा कार्याध्यक्ष,शिवाजी मडव सल्लागार,संजय तांबे सल्लागार,संदीप गोसावी सल्लागार,श्रीकृष्ण कांबळी संचालक,ईश्वरलाल कदम जिल्हा संघटक,जगन्नाथ घाडीगावकर तालुका उपाध्यक्ष,अजय सावंत तळेरे विभागीय अध्यक्ष,राजेंद्र कडूलकर कणकवली विभागीय अध्यक्ष,नेहा मोरे महिला आघाडी शिक्षक नेत्या,निकिता ठाकूर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी,रश्मी आंगणे तालुका संपर्कप्रमुख महिला आघाडी
बहुसंख्य शिक्षकवर्ग उपस्थित होते





