जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार

प्रभाग रचनेसाठी शासनाकडून कार्यक्रम जाहीर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद, तर पण 100 पंचायत समिती सदस्य असणार
गोपनीयता न पाळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विरोधात कारवाई होणार
गेले अनेक वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना करण्यासाठीचा कार्यक्रम शासनाकडून जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यामध्ये शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे निर्वाचक गण तयार करत असताना कोणत्याही ग्रामपंचायतचे विभाजन होता नये याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 2017 च्या निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेत कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. निर्वाचक गण /निवडणूक विभाग ठरवताना त्या गण किंवा विभागातील जास्तीची लोकसंख्या असलेल्या गावाचे नाव त्या गट किंवा विभागाला देण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना 14 जुलै 2025 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकारी यांच्याकडे 21 जुलै पर्यंत सूचना व हरकती घेता येणार आहेत. तसेच प्राप्त हरकतींच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव 28 जुलै पर्यंत सादर करायचा आहे. तर प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांनी 11 ऑगस्ट पर्यंत निर्णय द्यायचा आहे. तर 18 ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. या प्रभाग रचने संदर्भात गोपनीयता पाळायची असून गोपनीयतेचा भंग केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा देखील शासनाने दिला आहे. तसेच 12 जून 2025 च्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 50 जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 पंचायत समिती सदस्य असणार आहेत.