वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले तालुक्यात असलेले भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले . तसेच खानोली उपसरपंच निवडीत भाजपा व शिंदे गटाची युती होऊन पहिले अडीच वर्षे हे शिंदे गटाला उपसरपंच पद देण्यात आले.
आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीत वायंगणी ग्रामपंचायतीत रविंद्र सहदेव धोंड ( भाजपा ) , पेंडुर ग्रामपंचायतीत महादेव विजय नाईक ( भाजपा ), मातोंड ग्रामपंचायतीत आनंद रामचंद्र परब ( भाजपा ) तसेच खानोली ग्रामपंचायतीत सचिन आनंद परब ( शिंदे गट ) हे उपसरपंचपदी विराजमान झाले .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये सरपंच निवडणुकीतही चार पैकी तीन ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे सरपंच बहुमताने निवडून आले होते , तसेच उपसरपंच निवडीत ही चार पैकी तीन ठिकाणी भाजपाचे उपसरपंच बिनविरोध निवडून आल्यामुळे वेंगुर्लेत भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले.
वायंगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंच पदाचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला होता परंतु ९ पैकी ७ सदस्य भाजपाचे निवडून आले होते . आज उपसरपंच निवडीत भाजपाचे रविंद्र सहदेव धोंड हे बिनविरोध निवडून आले .यावेळी भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख व माजी सरपंच शामसुंदर मुननकर , माजी सरपंच तात्या केळजी , रविंद्र पंडीत , ग्रामपंचायत सदस्य – अनंत केळजी , महेश मुननकर , अनंत मठकर , राखी धोंड , विद्या गोवेकर , सविता परब , बुथप्रमुख आबा धोंड , संतोष साळगावकर , सुधर्मा कावले , दिगंबर धोंड , राकेश धोंड , विष्णु म्हारव , समिर धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सावंतवाडी, प्रतिनिधि

error: Content is protected !!