बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

नागरिकांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन
कुडाळ । प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मानवंदना-देण्यात येणार आहे
२६ नोव्हेम्बर, २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक शहीद झाले. या सर्वांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात शहीद स्तंभ उभारून दरवर्षी त्यांस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते.
बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २६/११/२०२२रोजी सकाळी ९.०० वाजता मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच बळी पडलेल्या निष्पाप नागरिक यांना, प्रमुख पाहुणे व संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात येणार आहे.
याच दिवशी शासनाच्या निर्देशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन व राष्ट्रीय छात्र सेना दिन म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. तरी सकाळी ९.०० वाजता देशप्रेमी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे . असे आवाहन बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व संयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





