भिरवंडे रामेश्वर मंदिरात रविवारी दीपोत्सव

11 हजार 111 दिव्यांची करणार आरास
कार्तिक मास त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून देवालये संचालक मंडळ भिरवंडेच्या वतीने रविवार 26 नोव्हें. रोजी भिरवंडे रामेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 11 हजार 111 दिव्यांची आरास करून यंदाचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. याचबरोबर ‘जलवा 2023‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दीपोत्सव. भाविक-भक्तांच्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी श्री देव रामेश्वराचा भरभरून आशीर्वाद पाठीशी राहणार आहे. रविवारी 26 नोव्हें. रोजी दीपोत्सवाच्या सायंकाळी भाविकांना तेल, दीप आणि वातीचा दिवा श्री देव रामेश्वराला अर्पण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सायं. 6.30 वा. दीपोत्सव, त्यानंतर 7.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम
चिमणी पाखरे डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जलवा 2023 सादर होणार आहे. या दीपोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवालये संचालक मंडळ आणि भिरवंडे ग्रामस्थांनी केले आहे.
कणकवली, प्रतिनिधी





