मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले.
मनोहर मनसंतोष गडावर शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा ज्याठिकाणी एकत्र येतात त्या बाजार आंबा येथील मनोहर मनसंतोष गडाच्या माहितीचे फलक जीर्ण झालेले होते. या ठिकाणी नवीन माहितीदर्शक फालकाची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेता या ठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे माहितीदर्शक फलक लावण्यात आला. या मध्ये मनोहर मनसंतोष गडाची प्राथमिक माहिती, दुर्ग भ्रमंती करणाऱ्यांसाठी सूचना, गडाचा नकाशा, तसेच गडाचा इतिहास इत्यादीचा समावेश या माहिती फालकात आहे.
या मार्गदर्शक फलक मोहिमेसाठी गणेश नाईक, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, प्रकाश कडव, मेघश्याम सावंत, यश कडव, ओंकार शेडगे, विनायक बांग व विशाल परब इत्यादी उपस्थित होते.
वरील माहितीफलकासाठी मेघश्याम सावंत यांनी आपल्या कै.विश्वनाथ बुधाजी सावंत यांच्या स्मरणार्थ मोलाचं वाटा उचलला.त्यांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आभार व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!