बांधकरवाडी येथील इलेक्ट्रिशियन शेखर साटम यांचे निधन

कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी इलेक्ट्रिशियन शेखर विष्णू साटम ( 40 ) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, वहीनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. शेखर हे लायटिंगचे कामे करायचे. कणकवली, जानवली, कुंभवडे, हरकुळ ब्रु., मुडेश्वर तसेच वरवडे, याठिकाणी मंदिरातील उत्सवानिमित्त परिसरात विद्युत रोषणाई करायचे. त्यांच्या इलेक्ट्रिकल्स व्यवसायामुळे तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वत्र परिचित होते.बांधकरवाडी स्वयंभू मंदिराच्या प्रत्येक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता.उद्या रविवारी सकाळी माऊली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!