तारकर्ली एम टी डी सी येथे दोन पोलिस आणि दोन जीवरक्षक त्वरित नियुक्त करा अन्यथा ५ डिसेंबर ला आमरण उपोषण

मालवण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ नावाजलेले निसर्गरम्य तारकर्ली गावी एम टी डी सी येथे सतत पर्यटक ये जा करत असतात .आणि पर्यटकांची वर्दळ मोठ्याप्रमाणात वाढलेली असता याठिकाणी आलेला पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात उतरतो परंतु कित्येकवेळा पर्यटकाला पाण्याचा अंदाज येत नसल्याने आणि खोलवर पाण्यात भोवरा मिळाला की पाणी आत आपोआप खेचत नेत आणि अचानक अपघात होतात .याकरिता या अपघात ठिकाणी कायम स्वरुपी दोन पोलिस हवालदार आणि दोन जीवरक्षक यांची येत्या आठ दिवसांत नियुक्त करून तारकर्ली येथील मच्छीमार नागरिकांना होणाऱ्या मानसिक मनस्तापाला आपल्याकडून सहकार्य करावे. अशी मागणी भाजप कोकण विकास आघाडी मुंबई चे सचिव सुरेश बापर्डेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले आहेत की, काल पर्यंत होणाऱ्या गंभीर लक्षात घेता येत्या आठ दिवसांत नक्कीच विचार करून त्वरित कारवाई करण्यात येईल.असा विश्वास व्यक्त केला तारकर्ली एम टी डी सी पर्यटन स्थळ नाजिक समोरील समुद्रात प्रतिवर्षी येणारे पर्यटक आपले मनोरंजन करिता समुद्रात आंघोळ करत असतात पण त्या पर्यटकांना नेमक कुठे जावं हे तेथे असलेल्या व्यवसायिक ग्रामस्थ आणि नागरिक यांनी सांगितले तरी ते ऐकत नाहीत.तर त्याठिकाणी समोरच असलेल्या पाण्याच्या नेमके खोलवर भोवरा असलेल्या ठिकाणी काही जण समुद्राच्या पाण्यात भोवरा आहे अशा ठिकाणी गेल्यावर काही पर्यटक त्यात अडकले की त्यातील काहिंना वाचविण्यात स्थानिक पातळीवर ग्रामस्थ आणि नागरिक यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यावर यश प्राप्त होते तर त्यातील काही वाहून जाऊन मृत्युमुखी पडतात.यामुळे या तारकर्ली गावच नाव भितीमय होऊन याचा परिणाम या गावच्या पर्यटनावर होत आहे.त्यामुळे पर्यटक काहीवेळा भितिस्तव येत नाही .तारकर्ली चे ग्रामस्थ आणि नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता त्या पर्यटकाला वाचविण्याचा प्रयत्न करून वाचवित असतात.ते कोणतीही अपेक्षा न ठेवता त्या पर्यटकांना वाचावीत असतात.परंतु त्यांच्या जिवाचं काही बर वाईट झालं तर त्यांच्या कुटुंबाचं पुढे काय होईल.त्यांची जबाबदारी कोण घेणार जेणे करून याठिकाणी कायमस्वरूपी दोन पोलिस हवालदार यांच्या दबावाने आणि भीतीने घाबरून त्या समुद्रातील भोवरा पाण्यात आंघोळ करायला जाणार नाहीत आणि दोन जीवरक्षक काही विपरीत घटना घडल्या की ते आपल्या संपूर्ण सुरक्षा कवच सह बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्याचे प्रयत्न करतील.याच करिता मालवण पोलीस स्टेशन आणि मालवण तहसीलदार यांना विनंती करत आहे.त्याचा शक्यतीतक्या लवकर दोन पोलीस हवालदार आणि दोन जीवरक्षक यांची काहीही करा पण त्वरित नियुक्ती करून तारकर्ली गावच्या नावाला वाचवा ही आग्रही नम्र विनंती.
जर आपंनाकोनाहीकडून या माझ्या मागणीचा आठ दिवसात विचार केला गेला नाही तर दिनांक ५ डिसेंबर २०२३ ला तहसीलदार कार्यालय समोर मी आणि माझ्या समवेत ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहे.याची आपंनास आगाऊ सूचना करीत आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. असे बापर्डेकर यांनी शेवटी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!