नाम.दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने शिरोडा व बांदा बस स्थानकांना प्राप्त होणार नवीन झळाळी

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून शिरोडा व बांदा या बसस्थानकांचे नूतनीकरण होणार आहे.

शिरोडा बस स्थानकासाठी दोन कोटी रुपये तर बांदा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 67 लाखाचा निधी मंजूर झालेले आहे यामध्ये बांदा बसस्थानक इमारतीचे नूतनीकरण होणार असून शिरोडा बसस्थानकाचे नूतनिकरणांसह वाहनतला चे काँक्रीटिंग होणार आहे. याची प्रशासकीय मान्यता झाली असून लवकरच हे काम पूर्ण होऊन बांदा आणि शिरोडा ही बसस्थानके प्रवाशांच्या सेवेसाठी सुसज्ज पद्धतीने सेवेत येणार आहेत.अशी माहिती केसरकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

सावंतवाडी(प्रतिनिधी)

error: Content is protected !!