अभय घाडीगांवकर यांचे निधन

अभय राजाराम घाडीगांवकर ( 53) मूळगाव कळसुली ( देऊळवाडी ) , तालुका- कणकवली यांचे नुकतेच डोंबिवली मुक्कामी निधन झाले . शिवसेना (उबाठा ) चे माजी शाखाप्रमुख असलेले अभय सध्या डोंबिवलीचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते . क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबई संस्थेच्या डोंबिवली विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते . हसतमुख आणि मनमिळावू असलेले अभय हे आपत्कालीन कार्यामध्ये नेहमी सहभागी होत .त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या पश्चात पत्नी ममता आहे .
कणकवली प्रतिनिधी