सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व आंबोली सैनिक स्कूलतर्फे तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा

सोमवारी 20 नोव्हेंबरला गार्डन मध्ये

सावंतवाडी प्रतिनिधी बाल दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी मध्ये सैनिक स्कूल आंबोली, आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा 2023 सोमवार 20 नोव्हेंबरला सायंकाळी तीन ते सहा या वेळेमध्ये जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे.यात पहिला गट
लहान मुलांचा आणि दुसरा गट मोठ्या मुलांचा असणार आहे
लहान मुलांच्या गटासाठी १ ते ३ क्रमांकाला वस्तू स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार असून
मोठ्या मुलांच्या गटासाठी १ ते ३ क्रमांकाला वस्तू स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला
सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. लहान मुलांचा गट पहिली ते चौथी तर मोठ्या मुलांचा गट पाचवी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ब्रँडेड टिफिन बॉक्स, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ड्रॉइंग बुक, आणि तृतीय क्रमांकाचे स्केच पेन आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, रंगभरण चित्र तालुका पत्रकार संघातर्फे पुरविण्यात येणार आहे. मात्र चित्र रंगवण्यासाठी लागणारे रंग स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहेत कोणतेही रंग ते वापरू शकतात तर चित्राच्या एका कोपरयात स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वय व इयत्ता लिहीणे आवश्यक आहे. एक स्पर्धक एक चित्र असा नियम असून स्पर्धेचे उद्घाटन सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच आंबोली सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, संचालक जॉय डॉन्टस जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष अमोल टेंबकर हे असणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत
तरी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपली नावे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयूर चराठकर मोबा नं. 94058 27169 व खजिनदार रामचंद्र कुडाळकर मोबा नं.9763717761 यांच्याकडे रविवार 19 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदवावीत. व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!