गोव्या मधून चोरीला गेलेली स्कूटर कणकवली मध्ये सापडली

महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांकडून स्कूटर मालकाच्या ताब्यात
नाईक पेट्रोल पंप वागदे आवारात एप्रिल महिन्यापासून यामाहा स्कूटर नंबर (GA03AH6451) होती.पेट्रोल पंपावरील अक्षय मेस्त्री याने महामार्ग पोलीस केंद्र ओसरगाव कणकवली चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गवस यांना कळविली.सदर स्कूटर मालक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ती स्कूटर चोरीस गेलेली होती हे निष्पन्न झाले. परंतु त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल नव्हती.त्यांनी पणजी पोलीस ठाण्यात पत्र दिलेले होते. त्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गवस यांनी पणजी गोवा पोलीस ठाण्यात संपर्क साधून ती स्कूटर मालकाच्या ताब्यात दिल्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे महामार्ग केंद्र, कसाल ओसरगाव यांनी महामार्ग वाहतूक पोलीस अंमलदार यांना चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याबाबतच्या वारंवार सुचना दिलेल्या आहेत. गोवा येथील स्कूटर मालक श्री.ॲलेक्स घोन्सालवीज यांनी महामार्ग पोलिसांचे आभार मानले. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस अंमलदार एकनाथ सरमळकर,योगेश लाड, नितीन शेट्ये, रवि इंगळे, सागर परब आदी उपस्थित होते.