शेतकऱ्यांना उत्पादन वाढविणारी श्री भात लागवड पद्धत फायद्याची –विवेक रंगे

खत बियाण्यांच्या वाढत्या किंमती मुळे शेती करणे मोठ्या खर्चाचे बनले आहे.यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी भात लागवडीची श्री पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे मत कृषी सेवक विवेक रेगे यांनी आचरा डोंगरेवाडी येथे व्यक्त केले.युएनडीफी जीसीएफ व तालुका कृषी अधिकारी मालवण यांच्या सहकार्याने आचरा डोंगरेवाडी येथील शेतकरी सचिन बागवे यांच्या शेतात”श्री पद्धतीने भात लागवड शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.यावेळी त्यांच्या सोबत
युएनडीपी मालवण तालुका समन्वयक आशिष जाधवसर , तालुका पीकविमा प्रतिनिधी नार्वेकर आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, सहायक कृषी अधिकारी ए. डी. कुरकुटे कृषिसेवक राहुल इंगवले , हंसराज. देवकत, प्रगतिशील शेतकरी पद्माकर गोगटे , सचिन बागवे,समिर ठाकूर , सुहास सावंत, कांता बागवे, सचिन दुखंडे, महेंद्र राणे,मेघा गोगटे,संजय परब यांसह अन्य प्रशिक्षनार्थी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीसेवक आर एस डाखोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रगतशील शेतकरी पद्माकर पुरुषोत्तम गोगटे यांनी श्री पद्धतीची लागवड कशी करावी याविषयी स्वतःचे अनुभव कथन केले.
युएनडीपी समन्वयक आशिष जाधव यांनी श्री भात लागवडी बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री पद्धती लागवड तंत्रज्ञान, रोपवाटिका तयार करणे , खत व्यवस्थापन , किडरोग नियंत्रण याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी ऍग्रिस्टॅक नोंदणी , फळबाग लागवड योजना , पीएम किसान , जलकुंड , गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह योजना , महा डीबीटी याविषयी माहिती देण्यात आली. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागा तर्फे करण्यात आले.
आभार आर एस डाखोरे यांनी मानले.

error: Content is protected !!