वीज दुरुस्तीचे काम करताना विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या वीज कंत्राटी वायरमन अमोल कलंगुटकर यांच्या कुटुंबियांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आर्थिक मदत

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आरोस या ठिकाणी वीज दुरुस्तीचे काम करताना विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या वीज कंत्राटी वायरमन व आरोस कलंगुटकरवाडी येथील अमोल भरत कलंगुटकर (२५) यांच्या कुटुंबियांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड लाखाची मदत केली आहे. त्यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांकडे ही मदत त्यांनी सुपूर्द केली. आरोस सरपंच शंकर नाईक यांनी याबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले होते. अमोल कलंगुटकर हा वीज वितरण चा कंत्राटी कामगार होता. वीज दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागत वीज खांबालाच तो लटकला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. आरोस ग्रामस्थांनी एकजूट दाखऊन वीज ठेकेदारावर हलगर्जीपणाचा आरोप करून कलंगुटकर कुटुंबियांना मदत करण्यास भाग पाडले होते. शिक्षण मंत्री केसरकर यांनी मंगळवारी कलांगुटकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत दीड लाखाची मदत सुपूर्द केली. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली. यावेळी आरोस
सरपंच शंकर नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, केसरकर यांचे स्वीय सहाय्यक रामचन्द्रआंगणे, योगेश नाईक, बाळा शिरसाट, संजू पांगम, बाळा मोरजकर, देऊलकर, प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!