आडेली येथील नृत्य स्पर्धेत मृणाल, पूर्वा, दुर्वा विजेत्या

उत्कर्ष मंडळाची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
प्रतिनिधी । कुडाळ : आडेली येथील जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पूर्वा मेस्त्री दुर्वा पावसकर विजेत्या ठरल्या. उत्कर्ष कार्यकारी मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर आडेली यांच्या वतीने दिपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स मोठा व लहान दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच प्रकाश गडेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वेंगुर्ला योगेश कुबल, भाऊ धणेॅ ;आप्पा ठाकूर पुरुषोत्तम धणेॅ, लाडू जाधव ,रमेश आडेलकर ,चंद्रकांत आडेलकर,केशव जाधव व्यासपीठावर उपस्थित होते, या स्पर्धेमध्ये 45 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे, मोठा गट प्रथम मृणाल सावंत व पूर्वा मेस्त्री, द्वितीय जयेश सोनुर्लेकर व प्रेयेश पवार, तृतीय दिक्षा नाईक, उत्तेजनार्थ नेहा जाधव व यज्ञेश गायकवाड. लहान गट प्रथम दुर्वा पावसकर, द्वितीय सृष्टी पवार व निधी खडपकर, तृतीय आरव आईर, उत्तेजनार्थ भूमी मर्गज व हर्षदा धरणे यांनी मिळविला. विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.
प्रकाश गडेकर, भाऊ धरणे, योगेश कुबल, सचिन गडेकर, केशव जाधव, सौ पुनम आडेलकर उपथित होते. स्पर्धेचे आयोजन उत्कर्ष कार्यकारणी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. व याचे नियोजन अध्यक्ष उदय आडेलकर यांनी केले होते. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण ओकार परब यांनी तर आभार रमेश आडेलकर यानी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आंबेडकर नगरातील युवकांनी व मंडळातील पदाधिकारी व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली व स्पर्धा यशस्वी केली.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.