देवबाग येथे के.जी ते १०वी विद्यार्थ्यांना म.कश.वी.कडून वह्या वाटप

मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई यांच्या वतीने मालवण तालुक्यातील देवबाग गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तर वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला देवबागचे ज्येष्ठ नागरिक समाज बांधव श्री आबा कुर्ले हे प्रमुख पाहुणे होते.तर समाजसेवक दाजी राऊळ, म. क्ष. वि. मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर,देवबाग ग्रामपंचायत शिपाई दादा सातोस्कर,समाजसेवक बबी कासवकर यांच्या हस्ते देवबाग मधील के .जी .ते दहावी शिकत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि गरीब मुलांना दप्तर यावेळी वाटप करण्यात आले. या वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांनी आणि दप्तर १० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. यावेळी संस्थेने राबविलेल्या वर्धापन दिनानिमित्त दहावी पास देवबाग येथील प्राची तळवडकर हिला मंडळातर्फे प्रसिस्तपत्रक आणि मोठ पाण्याचं थर्मास कूर्ले यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बापर्डेकर यांनी या संस्थेला १०५ वर्षे झाली.प्रतिवर्षी संस्थेचा वाढदिवस मुंबई येथील त्यांच्या हॉल मध्ये घेण्यात येतो १०वी,१२वी,पदवीधर यांचा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याज त्यांच्या अटी शर्ती प्रमाणे सर्वात जास्त गुण ,सर्वात जास्त विषयात गुण संपादन करणाऱ्यांना दिलं जातं आणि ज्यांनी भाग घेतला असेल त्यांना संस्थेकडून प्रत्येक वर्षी वेगवेगळा शालोपयोगी भेट देऊन गौरविण्यात येते.पुढील वर्षी देवबाग तारकर्ली येथून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले .उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे दादा सातोस्कर यांनी आभार मानले.
मालवण(प्रतिनिधी)