कणकवलीतील पाणी पातळी खालावत आहे!

सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
कणकवली येथील विहिरींच्या पाण्याची पातळी झपाट्याने होते आहे कमी, वेळी च संबंधितांनी उपाययोजना करावी”याकडे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे
आम्ही आपल्या असे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे
त्या करिता आता मागील सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरात च गड नदी ला असणाऱ्या बंधार्याला, पाणी अडवण्यासाठी च्या प्लेट बसविने अत्यंत महत्त्वाचे आहे” असे पेडणेकर यांनी म्हंटले आहे
तसेच जानवली नदीच्या पात्रात सुध्दा, जो माती, दगड रचून, पावसाळा संपल्यानंतर बंधारा केला जातो, तोही होणे आवश्यक आहे
अन्यथा कणकवली करांवर पाण्यासाठी मागील वर्षा सारखी वणवण फिरण्याची वेळ येऊ शकते, आणि म्हणूनच संबंधित प्रशासनाला आमची विनंती आहे.
तरी हे येत्या महिनाभरात हे होणे आवश्यक आहे. संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी आणि आम्ही कणवकली करांवर येणारे पाण्याचे संकट निवारण करावे”असे आवाहन राजेंद्र पेडणेकर यांनी केले आहे
कणकवली(प्रतिनिधी)