कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, सचिव कवी विठ्ठल कदम, प्रा. डॉ. गणेश मर्गज, प्रा. एन. डी. कार्वेकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. गोवेकर यांसह काही साहित्यप्रेमी उपस्थित होते.
सदर कवी संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित कवींना मार्गदर्शन करीत स्वतः माती आणि नातीशी जोड असणारी कविता सादर केली. त्यानंतर उपस्थित असलेले कवी आणि कवयित्री यांनी कोजागरी संमेलनात रंगत आणली. यात कवी वाय.पी नाईक, मालवणी कवी रामदास पारकर, सद्याचे आघाडीचे कवी दीपक पटेकर, विठ्ठल कदम, प्रज्ञा मांतोडकर, ऋतुजा सावंत – भोसले, किशोर वालावलकर, मनोहर परब, स्वप्ना गोवेकर, मंगल नाईक, प्रा.रुपेश पाटील, प्रा. श्वेतल परब, दत्ताराम सावंत, संतोष पवार, आशा मुळीक, सुहासिनी सडेकर यांनी दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रतिनिधी, सावंतवाडी