पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात . या संवादातून देश पातळीवर ज्या ज्या चांगल्या बाबी घडलेल्या असतात त्याबाबत विवेचन करतात . त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या ज्ञानात भर पडते . ह्या वेळचा मन कि बात कार्यक्रम सुतार व शिल्पकार समाजाच्या बांधवांनी पहावा यासाठी भाजपा च्या वतीने वेंगुर्लेत आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये आयोजन केले होते .
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वकर्मा जयंती* च्या निमित्ताने पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला .

या योजनेमुळे विश्वकर्मांना ओळख व पाठबळ मिळाले आहे . तसेच असंघटित क्षेत्रातील पारंपरिक शिल्पकार व कारागीरांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध झाले आहे . त्यामुळे आर्थिक प्रगती साधता येईल . केंद्र सरकारच्या सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे , तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले .
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ , सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवलेले शरद मेस्त्री , तालुकाध्यक्ष बाबुराव प्रभाकर मेस्त्री , गुंडु वामन मेस्त्री , महादेव व.मेस्त्री , भालचंद्र मेस्त्री , संदीप मेस्त्री , महेश मेस्त्री , भरत मेस्त्री , रघुनाथ मेस्त्री , मंदार ज्ञानेश्वर मेस्त्री , सुधाकर गांवकर , आत्माराम मेस्त्री , अनिल देसाई , सुधीर रा.कावले , सचिन मेस्त्री , दिपक मेस्त्री , कृणाल चोडणकर , शरद पांडुरंग मेस्त्री , संतोष दामोदर मेस्त्री , आनंद दा. मेस्त्री ,भाजपा ता. चिटणीस जयंत मोंडकर इत्यादी सुतार शिल्पकार समाज बांधव उपस्थित होते.

सावंतवाडी, प्रतिनिधि

error: Content is protected !!