कणकवली तहसीलदार, पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

रविवारी पहाटे अवैध वाळु वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम
अवैध वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले
अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवली चे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास कणकवली तहसीलदारांनी तब्बल चार अवैध वाळु वाहतुकीच्या डंपर वर कारवाई केली. महसूल चे पथक या कारवाई सहभागी झाले होते. कलमठ व कणकवली भागात रत्नागिरीच्या दिशेने वाळू घेऊन जाणारे डंपर ताब्यात घेतले. हे ताब्यात घेतलेले डंपर कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. तर कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह वाहतूक पोलीस विनोद चव्हाण किरण मेथे, आदींच्या पथकाने मसुरकर किनई रोडवर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीच्या डंपर वर कारवाई करत हा डंपर तहसीलदार कार्यालयाच्या स्वाधीन केला. अचानक सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक दारांचे धाबे दणाणले आहेत.
दिगंबर वालावलकर, कणकवली