आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचीच सत्ता येईल-संदेश पारकर

भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याने केंद्र आणि राज्यातील सरकार विरोधात लोकांमध्ये संताप आहे या मुळे शिवसेना महाविकास आघाडी हा सक्षम पर्याय वाटत असल्याने आचरा ग्रामपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा फडकेल आणि सरपंचासह सर्वच सदस्य बहुमताने निवडून येतील असा विश्वास उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आचरा येथे व्यक्त केला.
आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर, विनायक परब, दिलीप कावले, दशरथ घाडी, नंदकिशोर सावंत, अनुष्का गांवकर, सदानंद घाडी माजी सरपंच प्रणया टेमकर,चंदन पांगे, माणिक राणे यांसह बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना पारकर यांनी आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने या भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावलेत.यामुळे शिवसेना महाविकास आघाडीवर येथील मतदारांचा विश्वास आहे. असे मत व्यक्त केले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!