कुडाळ संघामार्फत ५० महिलांना उज्वला कनेक्शन.

निलेश जोशी | कुडाळ : तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या हिंदुस्थान पेट्रोलीयम एजन्सीद्वारा दुसऱ्या टप्प्यातील उज्ज्वला योजनेचा ५० महिलांना उज्ज्वला कनेक्शन देऊन भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, उपाध्यक्ष अरविंद शिरसाट, संचालक प्रसाद रेगे, निलेश तेंडूलकर, अकौंटट संतोष राठीवडेकर, गॅस विभाग प्रमुख नागेश तवटे, प्रसाद परब, श्रीकांत देसाई तसेच गॅस विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष दिपक नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी असलेल्या योजनाबद्दल माहिती दिली तर उपाध्यक्ष अरविंद शिरसार यांनी महिलांना गॅस वापरण्याबाबतच्या सूचना देत संघामार्फत कुडाळ तालुक्यात होत असलेल्या गॅस सिलिंडर वितरणाबाबत माहिती दिली व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाकडे उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी करावी असे आवाहन केले, यावेळी प्रत्यक्षात ५० महिलांना उज्वला कनेक्शन देण्यात आले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





