वेतोरे येथील जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत आणि सायली राऊळ प्रथम

लहान गटातून निधी खडपकर प्रथम
रिक्षा टेम्पो युनियन वेतोरे यांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : :रिक्षा टेम्पो युनियन वेतोरे आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत, सायली राऊळ तर लहान गटात निधी खडपकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री देवी सातेरीच्या रंगमंचावर जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धा मोठा गट प्रथम मृणाल सावंत सायली राऊळ, द्वितीय नेहा जाधव समर्थ गवंडी, तृतीय संजना पवार, उतेजनार्थ दीक्षा नाईक, लहान गट प्रथम निधी खडपकर, द्वितीय वैष्णवी मुणनकर व आरव आईर, तृतीय द्विश्मंम परब, उत्तेजनार्थ स्वरा पावसकर यांनी मिळविला. परीक्षण भरतनाटयम् पदवी प्राप्त कविता राऊळ, तुळशीदास आर्लेकर यांनी केले.
बक्षीस वितरण प्रसंगी रिक्षा-टेम्पो युनियनचे अधक्ष – गुरूनाथ नाईक,प्रदिप नाईक,संजय नाईक गोटया राऊळ ,संदिप गावड़े,अजित नाईक, वैभव गावडे, शरद नाईक,प्रशांत नाईक,वैभव कुभार, विजय वालावलकर,सुनिल गावडे ,नाना वालवलाकर, ऊत्तम वालावलकर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. स्पर्धेची पारितोषिके व आकर्षक चषक राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रायोजित केले होते. बहारदार निवेदन दशावतार लोककला अभ्यासक प्रा वैभव खानोलकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





