श्री देव कलेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सव नियोजन बैठक संपन्न
कुडाळ : नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे यावर्षी महाशिवरात्र शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नेरूर कलेश्वर मंदिर सभागृह येथे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस अधिकारी नदाफ, देवस्थान स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष प्रदीप नाईक, नेरूर गावचे प्रथम नागरिक भक्ती घाडी, उपसरपंच म्हाडदळकर, माजी सरपंच चारुदत्त देसाई, देवस्थान स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य आणि नेरूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आरोग्य विभाग, महावितरण विभाग, एसटी महामंड आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी १८ तारीखला होणाऱ्या महाशिवरात्र उत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. महाशिवरात्र दिवशी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. आरोग्य यंत्रणेचे १७ कर्मचारी दिवस-रात्र या उत्सवादिवशी आपली सेवा देणार आहेत. यावेळी वीज पुरवठ्याविषयी सुध्दा चर्चा करण्यात आली. यावर्षी एसटी महामंडळचे वतीने कुडाळ-नेरूर-वालावल-कवठी, कुडाळ नेरूर आणि नेरूर-गणेशवाडी मार्गे माड्याचीवाडी अशा विशेष फेऱ्या १८ फेब्रुवारी सकाळी ते रविवार १९ फेब्रुवारी म्हणजे शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत रात्रदिवस एसटीच्या विशेष फेऱ्या चालू राहणार आहेत अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.
मागील दोन वर्षे कोरोनाचे थैमान चालू असल्या कारणाने नेरूर येथील कलेश्वर मंदिर या ठिकाणचा महाशिवरात्री उत्सव गेली दोन वर्षे मोजक्या भक्तगणांच्या उपस्थितीत महाशिवरात्री उत्सव पार पडला. तर यावर्षी १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर चा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ