सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मध्ये सावंतवाडी तालुक्यांतील निरवडे गावांतील भाजप व शिंदे गटातील ६०० वर पदाधिकाऱ्यांचा व ग्रामस्थ विद्यमान ग्रामपंचयत सदस्य यांचा झाला जाहिर प्रवेश

विद्यमान ग्रामपंचयत सदस्य दशरथ मल्हार, तसेच संदिप पाढरे ,रेश्मा पांढरे, माजी सरपंच सुभाष मयेकर याचां समावेश

सावंतवाडी : शिवसेनेत राज्यभरात आऊटगोईंग सुरू असताना सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात मात्र आज मोठा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप सह शिंदे गटातील प्रमुख व माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यानी शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात खास मोठी सभा घेऊन हा प्रवेश झाला . या मेळाव्यात सुमारे 700 हून अधिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला .

यावेळी या मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, , जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत . संदेश पारकर. अतूल रावराणे,चंद्रकांत कासार, राजु नाईक,सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमूख शैलेश परब,बाळा गावडे, राजु नाईक, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी सदस्य मायकल डिसोजा, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, गुणाजी गावडे, विनीता मेस्त्री, संजय तानावडे,तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी व्यापीठावर उपस्थित होते.

शिवसेना पक्षमध्ये सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील 600 वर ग्रामस्थ यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरत मल्हार , तसेच संदिप पाढरे, सुभाष मयेकर, रेश्मा पांढरे, काका पांढरे,तसेच निरवडे गावातील 600 च्यावर ग्रामस्थ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यात यावेळी जाहिर प्रवेश केला.

प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी

error: Content is protected !!