राज्यातील शिवसेना पक्षाची सत्ता गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्यात गुंडगिरी प्रवृती वाढली

मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदासंघाचां विकास खुटवला

मंत्री नारायण राणे यांनी जिल्यात उद्योग खाते मार्फत किती उद्योग आणले ते जाहीर करावे

खासदार विनायक राऊत यांची जोरदार टिका

सावंतवाडी : राज्यातील शिवसेनेची सत्ता गेल्यावर जील्यात पुन्हा गुंडगिरी वाढू लागली आहे पणं या जिल्यातील जनता त्यांची जागा दाखवणार आहे.सर्वच्य न्यायालयाचा निकाल लागल्यावर गद्दार आमदारांना त्यांची जागा दाखवली जाणार अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी निरवडे येतील सभेत जोरदार टीका केली. आज शिवसेना पक्ष प्रमुख यांच्यावर गद्दारी करण्याना त्यांची जागा जनता दाखवणार आहे. असे खासदार विनायक राऊत म्हणाले. मंत्री केसरकर हे स्वार्थी आहेत शिवसेना प्रमुख यांनी सर्व देऊन त्याच्यावर गद्दरी केली पणं त्याचे करणामे आपण एक दिवस बाहेर काढणार आहे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ची किती उद्घटन करणार लोकाचे हाल होत आहे विकास काम किती केलात या मतदासंघाचां विकास खुटला आहे मंत्री नारायण राणे यांनी किती उद्योग धंदे जिल्ह्यात अन आणले ते जाहीर करावे असे त्यांनी आवाहन दिले.

शिवसेनेत राज्यभरात आऊटगोईंग सुरू असताना सावंतवाडी
तालुक्यातील निरवडे गावात मात्र आज मोठा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप सह शिंदे गटातील प्रमुख व
माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यानी शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात खास मोठी सभा घेऊन हा प्रवेश झाला . या मेळाव्यात सुमारे 650हून अधिक कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला .

यावेळी या मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, , जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत . संदेश पारकर. अतूल रावराणे,चंद्रकांत कासार, राजु नाईक,सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमूख शैलेश परब,बाळा गावडे, राजु नाईक, शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी सदस्य मायकल डिसोजा, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, गुणाजी गावडे, विनीता मेस्त्री, संजय तानावडे, बड्या परब, अजय तानवडे,तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी व्यापीठावर उपस्थित होते.

शिवसेना पक्षमध्ये सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावातील 650 वर ग्रामस्थ यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरत मल्हार , तसेच संदिप पाढरे, सुभाष मयेकर, रेश्मा पांढरे, काका पांढरे, मुरारी भाईडकर तसेच निरवडे गावातील 650 च्यावर ग्रामस्थ यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यात यावेळी जाहिर प्रवेश केला. शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ व शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर विश्वास ठेऊन या लोकांनी शिवसेना पक्ष यात प्रवेश केला. हा एक आदर्श देणारा पक्ष प्रवेश आहे असे मत उपस्थित मान्यवर यांनी केलें.

आमदार वेयभव नाईक यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका यावेळी केली. आपला गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे .त्यामुळे आमदार फुटून गेले तरी जनता आमच्याबरोबर आहे असे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी उपस्थित
मान्यवर यांनी भाजप व शिंदे गट यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मोठ्ाप्रमाणावर जन समूदाय उपस्थित होता.

प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी

error: Content is protected !!