पाट हायस्कूलच्या कबड्डी संघाची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी । कुडाळ : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 17 वर्षे वयोगट मुली जिल्हा क्रीडा संकुल ओरोस , ता. कुडाळ येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत पाट संघाने प्राथमिक फेरीत दोडामार्ग संघावर ,उपांत्य सामन्यात कासार्डे कणकवली संघावर विजय मिळवला. अंतिम सामन्यात आर.पी.डी सावंतवाडी संघावर विजय मिळवित विजेते पद मिळवले. या संघाची निवड 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली.
या संघात कर्णधार कु.अश्विनी मालणकर, रिया पालकर ,चंदना मराळ,अदिती केरकर ,मनस्वी केरकर, वेदश्री ठाकूर ,भार्गवी पाटकर ,रिया आडेलकर ,वैष्णवी परब ,याशिका बेळगांवकर ,वेदश्री परब हे खेळाडू सहभागी झाले होते .विजय संघाला प्रशालेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री. राजन हंजनकर ,श्री. संजय पवार, श्री. दादू कुबल, श्री.दाजी रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघाचे अभिनंदन संस्था उपाध्यक्ष श्री. दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री.समाधान परब ,संस्था सचिव सुधीर ठाकूर ,संस्था कार्यकारिणी सदस्य देवदत्त साळगांवकर, श्री. राजेश सामंत ,अवधूत रेगे,त्याचबरोबर इतर सर्व संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक शामराव कोरे, शिक्षक प्रतिनिधी संदिप साळसकर ,सर्व शिक्षकवृंद व शालेय कर्मचारी यांनी केले. विजयी संघाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





